Wed, Nov 14, 2018 21:44होमपेज › Sangli › ८२ हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर १७५ कोटी

८२ हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर १७५ कोटी

Published On: Jan 03 2018 1:17AM | Last Updated: Jan 02 2018 11:15PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाचे 175 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत. 82 हजार 300 शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. दरम्यान, आणखी 3 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.  

कर्जमाफीच्या एक ते चार टप्प्यात जिल्ह्यात जिल्हा बँकेकडील  82 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाचे 175 कोटी रुपये वर्ग झाले आहेत. संबंधित शेतकर्‍यांना कर्जमाफी/प्रोत्साहन अनुदानाचे मेसेजही गेले आहेत. याशिवाय ओटीएस अंतर्गत दीड लाखांवरील रक्कम भरल्यास दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे.  दीड लाखावरील थकित कर्जाची रक्‍कम भरण्यास दि. 31 मार्च 2018 ही मुदत आहे. या मुदतीत दीड लाखावरील रक्कम भरल्यास संबंधित शेतकर्‍यांना दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. अनेक शेतकर्‍यांना त्याचा लाभ होणार आहे. 

पाचव्या टप्प्यातही कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएस पात्र शेतकर्‍यांची ‘ग्रीन  लिस्ट’ येणार का, याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर म्हणाले, सोमवारअखेर 82 हजार 300 शेतकर्‍यांच्या खात्यांवर कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाचे 175 कोटी रुपये वर्ग केलेले आहेत. शासनाकडे मंगळवारी आणखी तीन कोटींची मागणी केली जाणार आहे.