Thu, Jan 17, 2019 17:42होमपेज › Sangli › शिक्षकांच्या आणखी १६८ बदल्या 

शिक्षकांच्या आणखी १६८ बदल्या 

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 12:00AMसांगली : प्रतिनिधी

शिक्षक बदल्यांची चौथ्या टप्प्यातील यादी शनिवारी राज्यस्तरावरून जिल्हा परिषदेला प्राप्त झाली. 168 शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश ग्रामविकास विभागाकडून आले आहेत. दरम्यान जिल्हांतर्गत बदल्यांचा आणखी एक टप्पा लवकरच होईल, असे संकेत मिळत आहेत.  

राज्यस्तरावरून तीन टप्प्यात जिल्हा परिषदेकडील 2 हजार 444 शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झालेल्या आहेत. दरम्यान बदल्यांचा चौथा टप्पा शनिवारी झाला. सन 2018-19 च्या आंतरजिल्हा बदलीने आलेल्या 37 शिक्षकांना शनिवारी राज्यस्तरावरून नेमणुकीचे ठिकाण ऑनलाईन देण्यात आले. दरम्यान विस्थापित व समानीकरणाच्या जागेवर बदली झालेल्या 131 शिक्षकांनाही नेमणुकीचे ठिकाण देण्यात आले. समानीकरणाच्या जागेवर बदली झालेल्या शिक्षकांचा यापूर्वीचा बदली आदेश रद्द करून नवीन जागेवर बदली आदेश जारी केला आहे. 

शनिवारी 168 शिक्षकांना नेमणुकीचे आदेश देण्यात आले. या शिक्षकांच्या बदल्या जत आणि आटपाडी तालुक्यात झाल्या आहेत जत आणि आटपाडी तालुक्यातील बदली गैरसोयीची मानली जात आहे. मात्र जत, आटपाडी तालुक्यात शिक्षकांच्या रिक्त पदांचे प्रमाण जास्त असल्याने रिक्त पदांच्या समानीकरणासाठी 168 पैकी बहूसंख्य शिक्षकांची नेमणूक जत, आटपाडी तालुक्यात केली आहे. 

दरम्यान रिक्त पदांच्या समानीकरणाचा तसेच ‘शून्य शिक्षकी’ शाळांचा प्रश्‍न कायम आहे. सन 2017-18 मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या 55 शिक्षकांना अद्याप नेमणुकीचे ठिकाण मिळालेले नाही. त्यामुळे बदल्यांचा आणखी एक टप्पा लवकरच होईल, असे संकेत मिळत आहेत.