इस्लामपूर : वार्ताहर
‘स्वच्छ सर्व्हेक्षण 2018’ अभियानांतर्गत इस्लामपूर नगरपालिकेने ‘तारे जमीन पर’ या संकल्पनेवर आधारित घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत शहरातील विविध शाळांतील 1600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धा येथील कुसुमगंध उद्यानात पार पडल्या.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षणात सहभाग घेतला आहे. स्वच्छतेबाबत लोकजागृती व्हावी व लोकसहभाग वाढावा. यासाठी शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून या चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितले. तीन गटात पार पडलेल्या या स्पर्धेत 1600 विद्यार्थी सहभागी झाले होते. विजेत्यांना 3 हजार, 2 हजार रुपये, 1 हजार रुपये व प्रमाणपत्र बक्षीस देण्यात येणार आहे. यावेळी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, आरोग्य सभापती संग्राम पाटील, नगरसेवक शहाजीबापू पाटील, शकील सय्यद, जयश्री पाटील, संगीता कांबळे, प्रतिभा शिंदे, बशीर मुल्ला आदी उपस्थित होते.