Sat, Aug 24, 2019 18:51होमपेज › Sangli › मतदार याद्यांवर तब्बल १४११ हरकती; सर्वाधिक मिरज, कुपवाडमध्ये 

मतदार याद्यांवर तब्बल १४११ हरकती; सर्वाधिक मिरज, कुपवाडमध्ये 

Published On: Jun 19 2018 1:25AM | Last Updated: Jun 18 2018 10:54PMसांगली : प्रतिनिधी 

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीवर सोमवारी अखेरच्या दिवशी अक्षरश: हरकतींचा पाऊस पडला. दिवसभरात  हजार ते अकराशे पेक्षा जास्त हरकती दाखल झाल्या. एकूण हरकतींची संख्या 1411 झाली आहे. यात मिरजेत 683, कुपवाड मध्ये 397 तर सांगलीत 328 हरकती दाखल झाल्या आहेत. यावर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी दि.29 जूनरोजी, तर मतदान केंद्र निहाय यादी दि. 2 जुलैरोजी जाहीर होणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने प्रभाग निहाय मतदार यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक घोळ असल्याच्या तक्रारी होत आहे. काही प्रभागात लोकसंख्ये पेक्षा मतदार जास्त आहेत, तर काही ठिकाणी दुबार नावे, मतदारांची अदलाबदल झालेली आहे. मतदार यादीत जाणिवपूर्वक घोळ केल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून होत आहे.

तर प्रशासनाने या आरोपाचे खंडन केले आहे. 2011 ची लोकसंख्या व 2018 ची मतदार संख्या असल्याने फरक दिसत आहे. मात्र हरकतींची सुनावणी घेऊन मतदार यादीत असलेल्या त्रुटी दूर करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.  मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी सोमवारी शेवटची मुदत होती. या मुदतीत तब्बल 1411 हरकती दाखल झाल्या आहेत. सोमवारी एका दिवसातच हजार ते आकराशे हरकती आल्या आहे. 1411 मध्ये प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये 218 , 2 मध्ये 110, 3 मध्ये 397 व 4 मध्ये 686 हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी होवून अंतिम मतदार यादी 29 जून रोजी तर मतदान केंद्र निहाय मतदार यादी 2 जुलै रोजी प्रसिध्द होणारआहे.