Mon, Apr 22, 2019 12:17होमपेज › Sangli › राज्यात १४ हजार झेडपी शिक्षक अतिरिक्‍त?

राज्यात १४ हजार झेडपी शिक्षक अतिरिक्‍त?

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 11:54PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

राज्यात 34 जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडील 14 हजार 92 शिक्षक अतिरिक्‍त ठरले असल्याची माहिती शिक्षकांच्या विविध ‘व्हॉटस् अ‍ॅप’ गु्रपवर व्हायरल झाली आहे. जिल्हानिहाय अतिरिक्‍त मुख्याध्यापक, उपशिक्षक, पदवीधर शिक्षकांची माहिती त्यात नमूद केलेली आहे. दरम्यान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी यासंदर्भात स्पष्ट इन्कार केला आहे. अद्याप संचमान्यताच पूर्ण झाली नसल्याने अतिरिक्‍त शिक्षक संख्या कशी कळेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

प्राथमिक शिक्षकांच्या विविध व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर अतिरिक्‍त शिक्षकांबाबतची जिल्हानिहाय माहिती असलेला चार्ट व्हायरल झाला आहे.  राज्यात 61 हजार 492 शाळांमधील 14 हजार 92 मुख्याध्यापक, शिक्षक, पदवीधर शिक्षक अतिरिक्‍त ठरल्याची माहिती व्हायरल झाली आहे. सांगली जिल्ह्यातील 1704 शाळांमधी 15 मुख्याध्यापक, 72 उपशिक्षक, 28 पदवीधर शिक्षक असे एकूण 115 अतिरिक्‍त ठरल्याची माहिती व्हायरल झाली आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांच्याशी सपर्क साधला असता त्या म्हणाल्या, विद्यार्थी संख्येबाबत सरल प्रणालीवर माहिती भरणे सुरू आहे; अद्याप संचमान्यता पूर्ण झालेली नाही.