होमपेज › Sangli › माणिकनाळ येथे १४ हजारांचा गांजा जप्त 

माणिकनाळ येथे १४ हजारांचा गांजा जप्त 

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:47PM

बुकमार्क करा

उटगी  ः  वार्ताहर 

लमाणतांडा- माणिकनाळ (ता.जत) येथील फत्तू मेगू लमाण यांच्या मक्याच्या शेतात लागवड केलेला 14 हजार 750 रुपयांचा गांजा उमदी पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. उमदी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी ः लमाणतांडा- माणिकनाळ  येथील फत्तू लमाण  याच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भगवान शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे व पोलिस पथकाने छापा टाकला. शेतामध्ये वजन अडीच किलो  वजनाची 45 झाडे  मिळून आली. त्याची बाजारभावाने अंदाजे किमत 10 हजार 250 आहे.तयार वाळलेला गांजा 450 ग्रॅम जप्त केला. त्याची किंमत साडेचार हजार रुपये आहे.