Wed, Nov 21, 2018 22:06होमपेज › Sangli › सुरूलजवळ वर्‍हाडाचा टेम्पो उलटला: १३ जखमी

सुरूलजवळ वर्‍हाडाचा टेम्पो उलटला: १३ जखमी

Published On: Jun 19 2018 1:24AM | Last Updated: Jun 18 2018 11:14PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

सुरूल (ता. वाळवा) येथे वर्‍हाड घेवून निघालेला टेम्पो पलटी झाल्याने 13 वर्‍हाडी जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारच्या  सुमारास घडला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, टेम्पो (क्र.एम.एच.-10/झेड-5617) हा धामवडेवरून लग्नाचे वर्‍हाड घेवून येत होता.  सुरूलजवळ चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या चाचीमध्ये टेम्पो उलटला. अपघातानंतर टेम्पोतील लोकांनी आरडाओरडा केल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना टेम्पोतून बाहेर काढले. 

या अपघातात  सूर्यकांत आनंदा कांबळे (वय 35), मंगल तुकाराम कांबळे (वय 35), भागोजी भिमराव कांबळे (वय 28), संदीप लक्ष्मण कांबळे (वय 4), सुनिता जनार्दन कांबळे (वय 40), सविता दिनकर कांबळे (वय 65), सुरेखा विष्णू कांबळे (वय 40), सिद्धार्थ विरंग कांबळे (वय 45), छाया सयाजी कांबळे (वय 55), राणी बाळू दरगडे (वय 50), कमल सिद्धार्थ कांबळे (वय 42), सिंधूताई अधिक साठे (वय 35), सखुबाई पांडुरंग भमरगे (वय 56, सर्व रा. धामवडे, ता. शिराळा) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयत उपचार सुरू आहेत.