Sat, Apr 20, 2019 10:14होमपेज › Sangli › जिल्ह्यात १२२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

जिल्ह्यात १२२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 11:52PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 122 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झाला. त्यापैकी 82 ठिकाणी सार्वत्रिक; तर 40 ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. या सर्व गावांत सोमवारपासूनच आचारसंहिता लागू झाली असून दि. 27  मे रोजी मतदान होणार आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 654 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यात जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यापैकी मिरज तालुक्यातील 3, कवठेमहांकाळ 19, शिराळा 27, पलूस 2, खानापूर 4, आटपाडी 20, जत 5 आणि कडेगाव तालुक्यातील 2 गावांचा समावेश आहे. या गावात आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.  

निवडणूक होणारी गावे तालुकानिहाय अशी :

1) मिरज- कावजी खोतवाडी, निलजी बामणी, वाजेगांव.

2) कवठेमहांकाळ : बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, अग्रण धूळगाव, घोरपडी, करोली टी, कोकळे, शिदेवाडी, ढालेवाडी, ढालगाव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. 

3) जत : गुलगुंजनाळ, कोंत्याव बोबलाद, कोणबगी, बिळूर, खिलारवाडी. 

4) खानापूर : देवनगर, भेंडवडे, राजधानी भेंडवडे, साळशिंगे.

5) आटपाडी : नेलकरंजी, वाकसेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, खाजोडवाडी, आटपाडी, बनपुरी, भिंगेवाडी, करगणी, मापटेमळा, मुढेवाडी, निंबवडे, पुजारवाडी, विभूतवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी.

6) पलूस : अमणापूर, विठ्ठलवाडी.

7) कडेगाव : वाजेगाव, चिंचणीवांगी.

8) शिराळा : वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, करुंगली, खुजगाव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरसी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरुळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणी, मोरेवाडी, पं.त. वारुण, पाचगणी, मानेवाडी. 

दरम्यान, जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात मिरज 6, तासगाव 6, खानापूर 3, वाळवा 7, शिराळा 6, पलूस 3, आटपाडी 2, जत 7 आणि कडेगाव तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या गावांतील 58 प्रभागांत ही पोटनिवडणूक होणार आहे. 

Tags : sangli, sangli news, 122 Gram Panchayat, election, announced,