Thu, May 28, 2020 18:21होमपेज › Sangli › नवेखेड, वाळव्यात १२० एकर ऊस खाक

नवेखेड, वाळव्यात १२० एकर ऊस खाक

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 11:00PM

बुकमार्क करा

वाळवा : प्रतिनिधी

नवेखेड (ता. वाळवा) परिसरातील बाराबिघा व सातबिघा या नावाने ओळखल्या जाणार्‍या शेतातील उसाने मंगळवारी दुपारी अचानक पेट घेतला. सायंकाळपर्यंत ही आग वाढतच चालली होती. हुतात्मा साखर कारखान्याच्या दोन अग्‍निशमन गाड्यांकडून ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. सुमारे 120 एकर ऊस सायंकाळपर्यंत जळाला असून, या आगीमध्ये शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

नवेखेड परिसरातील निवास जाधव, शंकर जाधव, शिवाजी जाधव, बाबुराव जाधव, युवराज जाधव, अशोकराव जाधव, हौसेराव जाधव, विलास जाधव, वसंत जाधव, सर्जेराव जाधव, बाबुराव जाधव, पोपट जाधव, सयाजी कदम, संपत कदम, शिवाजी कदम, रामचंद्र जाधव, सुनील जाधव, सुबराव जाधव, राजाराम जाधव, भास्कर जाधव, मारुती जाधव, विजय जाधव यांचा ऊस जळाला.

या उसालगतच असलेल्या वाळवा हद्दीतील फडासही आग लागली. युवराज तांदळे, दीपक सूर्यवंशी, प्रमोद खंडागळे, सुभाष ताटे, सचिन हिंगणे, रामचंद्र कोरे, विशाल शिंदे, मनोहर नायकवडी, संभाजी माने, रामचंद्र माने, सोनाबाई महाजन या वाळव्याच्या शेतकर्‍यांचा ऊस या आगीमध्ये जळाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.  आगीमध्ये जळालेला ऊस हुतात्मा किसन अहीर व राजारामबापू साखर कारखान्याकडे नोंदविलेला आहे. आग आटोक्यात आली नाही तर फार मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्‍त केली असून नवेखेड, जुनेखेड, वाळवा या परिसरातील शेतकरी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते.