सांगली : मुंबईतून आलेल्या मुलीला कोरोना

Last Updated: May 23 2020 2:00PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


सांगली : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कोरोनाचे संकट वाढतच आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. सांगलीत मुंबई, पुण्यातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. मुंबईतील धारावीतून सांगली जिल्ह्यात येणारे नागरिक जास्त आहे. यातील बारा वर्षाच्या मुलीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. 

वाचा : कोरोनाबाधित दोघे अतिदक्षता विभागात 

धारावी येथून सांगली जिल्ह्यात आलेल्यांपैकी एक बारा वर्षाची मुलीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या मुलीला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन कक्षात ॲडमिट करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी ही माहिती दिली.

वाचा :तुंगच्या बालिकेचा खून; धागेदोरे हाती