Mon, Apr 22, 2019 12:18होमपेज › Sangli › कर्जमाफीचे १०० कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर

कर्जमाफीचे १०० कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर

Published On: Dec 12 2017 2:09AM | Last Updated: Dec 11 2017 11:56PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी  सन्मान योजनेंतर्गत तीन टप्प्यात जिल्ह्यातील 32 हजार 446 शेतकर्‍यांच्या खात्यावर 100 कोटी रुपये जमा केले आहेत. संबंधित शेतकर्‍यांची कर्जखाती नील केली आहेत. तीन टप्प्यात जिल्ह्यातील 90 हजार शेतकर्‍यांना 141 कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. प्रोत्साहन अनुदानाचे 36 कोटी रुपये शासनाकडून जिल्हा बँकेला यायचे आहेत. जिल्हा बँकेने ही रक्कम शासनाकडे मागितली आहे. 

कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 1 हजार 346 शेतकर्‍यांसाठी जिल्हा बँकेला 6.52 कोटी रुपये आले होते. जिल्ह्यात दुसर्‍या टप्प्यात 40 हजार 859 शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. थकबाकीदार 19 हजार 774 शेतकर्‍यांचे 72.19 कोटी रुपये कर्जमाफ झाले. नियमित कर्ज फेडलेल्या 21 हजार 85 शेतकर्‍यांना 36.39 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदानाचा लाभ झाला. 3 हजार 36 शेतकर्‍यांना कर्जमाफीचा तर 27 हजार शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ झाला आहे.

220 कोटी लाभाची यादी प्रसिद्ध

कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी शासनाने तीन टप्प्यात 89 हजार 790 शेतकर्‍यांची ‘ग्रीन लिस्ट’ जिल्हा बँकेच्या लॉगिनवर पाठविली आहे. हे शेतकरी 220 कोटींच्या लाभास पात्र आहेत. शासनाकडून जिल्हा बँक लॉगिनवर आलेली यादी  व विकास सोसायटीकडील माहिती याची शहानिशा करून लाभ देण्याची कार्यवाही गतीने सुरू झाली आहे. जिल्हा बँकेला 141 कोटी रुपये आले आहेत. त्यापैकी 100 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत. दरम्यान, प्रोत्साहन अनुदानाचे 36 कोटी रुपये शासनाकडून अद्याप यायचे आहेत.