Wed, Sep 19, 2018 22:05होमपेज › Sangli › कुपवाडमध्ये शंभरजण पोलिसांच्या रडारवर

कुपवाडमध्ये शंभरजण पोलिसांच्या रडारवर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : वार्ताहर

कुपवाड व परिसरातील विविध गुन्हेगारी टोळ्यांमधील सुमारे शंभर सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत. मोका, हद्दपारीसाठी त्यांच्या गुन्ह्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, यामुळे सराईत गुंड व त्यांच्या गॉडफादरचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

कुपवाड व परिसरात एका वर्षात तुलनेने गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. दीड महिन्यात दोन खून, खुनी हल्ले, बलात्कार, घर व दुकान गाळे खाली करण्याची सुपारी, अल्पवयीन मुलीचे अपहरण, हत्यारासह दहशत माजविणे, युवकाचे अपहरण, जबर मारहाण करून त्याची व्हिडीओ क्‍लीप करून व्हायरल करणे, असे अनेक गुन्हे वर्षभरात घडले आहेत. दरम्यान, अनेकवेळा गुन्हा घडल्यानंतर संशयितांचे ‘गॉडफ ादर’ पोलिसांना दूरध्वनी करतात अथवा  काही मिनिटांतच पोलिस ठाण्यात पोहोचतात. या लोकांच्या दबावाखाली  या दबावाखाली संशयिताला सोडून दिले जाते अथवा जुजबी कारवाई केली जाते. गेले काही दिवस असे प्रकार सुरू आहेत.

रामकृष्णनगर, आंबा चौक, कापसे प्लॉट व अहिल्यानगर येथील गुन्हेगारी कारवाईची संख्या जास्त आहे. विशेषत: 16 ते 22 वयोगटातील युवक हातात  तलवारी घेऊन दहशत माजवताना दिसत आहेत. राजकीय लाभासाठी  व  अवैध व्यवसायाला संरक्षण मिळावे यासाठी या युवकांचा वापर काही तथाकथित राजकीय नेत्यांकडून केला जातो. या पार्श्‍वभूमीवर या पोलिस ठाण्यासाठी पूर्णवेळ खमक्या  अधिकारी नियुक्‍त करण्याची मागणी होत आहे.

आंबा चौक येथे फ ाळकूट दादांचा  वावर जादा आहे.  या चौकात पोलिस मदत केंद्र चौकी आहे. मात्र  ती  नेहमीच बंद असते.  आमदार  सुधीर गाडगीळ व आमदार सुरेश खाडे यांनी हे केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.

Tags : sangli news, 100 criminals, police radar


  •