Thu, Feb 21, 2019 09:49होमपेज › Sangli › यावर्षी द्राक्षांची विक्रमी निर्यात 

यावर्षी द्राक्षांची विक्रमी निर्यात 

Published On: Mar 23 2018 2:00AM | Last Updated: Mar 22 2018 11:59PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातून आतापर्यंत 10 हजार 600 टन द्राक्षांची युरोप व आखाती देशात निर्यात झाली आहे.  आणखी महिनाभर हंगाम सुरू  राहण्याची शक्यता आहे. ही निर्यात 15 हजार  टनांवर जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे आतापर्यंतची ही विक्रमी  निर्यात मानली जात आहे.  दरम्यान, शेतकर्‍यांनी विक्रमी द्राक्ष निर्यात केल्यामुळे देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. सांगली जिल्ह्यात विशेषतः पूर्व भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी काही द्राक्षे स्थानिक बाजारपेठेत विकली जातात. काही बेदाणा निर्मितीसाठी वापरली जातात.  काही शेतकरी केवळ निर्यातीसाठी द्राक्षे तयार करतात. युरोपमध्ये द्राक्षे निर्यात करताना अनेक जाचक नियमांचे पालन करावे लागते. द्राक्षमण्याचा रंग, आकार त्यातील साखरेचे प्रमाण   हे तपासले जाते. त्यावर फवारणी केलेल्या औषधांचीही प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. 

गेल्यावर्षी 1 हजार 291 शेतकर्‍यांनी 677.81 हेक्टर क्षेत्राची ऑनलाईन पध्दतीने  नोंदणी केली होती. यंदा त्यात वाढ होत 1958 शेतकर्‍यांनी 1हजार 30 हेक्टर क्षेत्राची नोंद केली . यंदा आतापर्यंत 10 हजार 600 टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. 597 कंटेनर युरोपसाठी, तर 316 कंटेनरने आखाती देशात निर्यात झाली आहेत. नैसर्गिक संकटावर मात करून जिल्ह्यातील शेतकरी द्राक्षबागांची जोपासना करीत असतो. गेल्या काही वषार्ंत मात्र नियमित द्राक्ष उत्पादनाबरोबरच निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनास प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यातील मिरज पूर्वभाग, तासगाव व खानापूर तालुक्यातील घाटमाथ्यावर निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले जाते.  

Tags : Sangli, Sangli News, 10,600 ton,of grapes, district have been exported, Europe and Gulf countries.