Tue, Jul 16, 2019 02:17होमपेज › Sangli › आरोपीचे उपोषण; म्हणे, चुकीच्या गुन्ह्यात अडकवले

आरोपीचे उपोषण; म्हणे, चुकीच्या गुन्ह्यात अडकवले

Published On: May 04 2018 11:18AM | Last Updated: May 04 2018 11:20AMतासगाव : शहर प्रतिनिधी

चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताने जामिन मिळत नसल्यामुळे चक्क सांगली कारागृहात उपोषण सुरू केले. मला चुकीच्या गुन्ह्यात अडकवले असून, माझी फिर्याद दाखल करुन घ्यावी, यासाठी तब्बल चार वर्षानंतर या संशयिताने उपोषण केले. सुरेश रामचंद्र पवार (वय 48, रा. पवार मळा, शिवाजीनगर, पलूस) असे त्याचे नाव आहे.

दरम्यान त्याच्या उपोषणामुळे पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. राहूल पोपट मंगसुळे, विठ्ठल भिमराव मंगसुळे, दिलीप तानाजी यादव, सागर लालासो यादव, सयाजी शशिकांत माने, अमित रामचंद्र पवार, अमोल रामचंद्र पवार (सर्व रा. येळावी) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी सुरेश पवार हा भिलवडी येथील एका शाळेमध्ये स्कूल व्हॅन चालवत होता. विद्यार्थ्यांना पलूसला ने-आण करण्याचे काम तो करायचा. दि. 26 जुलै 2014 रोजी पवार याने नेहमीप्रमाणे त्याच्या स्कुलव्हॅनमध्ये (एम.एच. 10 ए.जी. 931) विद्यार्थ्यांसोबत पिडीत मुलीलाही शाळा सुटल्यानंतर बसवले.

यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ सोडले. मात्र पिडीत मुलीला 'तुझ्या आईने तुला येळावीत आणून सोडण्यास सांगितले आहे', असे खोटे सांगून येळावीकडे नेले. वाटेत एका शेताजवळ व्हॅन लावून मुलीवर बलात्कार केला. दरम्यान यापूर्वीही त्याने असा प्रकार केला असल्याचे आढळून आले. या प्रकारानंतर त्याच्यावर तासगाव पोलिसांत बलात्कार तसेच बाललैंगीक अत्याचार असे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले होते. यानंतर तासगाव तालुक्यात या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी अनेक आंदोलन झाली होती. यातून त्याला साडे तीन वर्षे झाली तरी जामिन मिळाला नाही.

काही दिवसांपूर्वी त्याने सांगली कारागृहामध्ये उपोषण सुरू केले. मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले असून मला मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करायचा आहे, अशी मागणी त्याने केली. यावर पोलिसांनी त्याला गुन्हा दाखल करण्यास परवानगी दिली.

तासगाव पोलिसांत त्याने दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे, 26 जून 2014 रोजी सकाळी शाळा असल्याने सर्व विद्यार्थ्यांना पलूस मध्ये सोडले. यावेळी संबंधीत मुलीच्या आईने ‘मुलीला येळावीत सोडा, आम्ही तिकडे कार्यक्रमाला आलोय’, असे सांगितल्याने पवार तिला तिकडे सोडायला चालला होता.

सकाळी पावणे बारा ते साडे बाराच्या सुमारास येळावी हद्दीतील एका घराजवळ पवार याची व्हॅन पंक्चर झाली होती. यावेळी तो पंक्चर काढत असताना वरील सात जण आले व मारहाण करु लागले. यातील एकाने मुलीच्या वडिलांना फोन करुन ‘व्हॅनचा चालक तुमच्या मुलीवर जबरदस्ती करत आहे’, असे सांगितले. यावेळी खाली पाडून मारहाण करुन पाकिटातील पाच हजार रुपये, मोबाईल काढून घेतले तसेच व्हॅनचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान केले.


Tags :  Accused, hunger, strike, jail sangali,rape case,Sangali