Sun, Sep 23, 2018 11:51होमपेज › Pune › पिंपरीत धारदार हत्याराने वार करून तरुणाचा खून

पिंपरीत धारदार हत्याराने वार करून तरुणाचा खून

Published On: Jul 31 2018 9:47AM | Last Updated: Jul 31 2018 9:47AMपिंपरी : प्रतिनिधी 

धारदार हत्याराने वार करीत एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी सांगवी येथे उघडकीस आली. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. अजित (वय ३५. पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध रुग्णालय नजीकच्या मजूर वसाहती जवळ अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.