Mon, Jul 22, 2019 05:04होमपेज › Pune › चाकण एमआयडीसी भागात युवकाचा खून 

चाकण एमआयडीसी भागात युवकाचा खून 

Published On: Dec 19 2017 9:35AM | Last Updated: Dec 19 2017 9:37AM

बुकमार्क करा

चाकण: प्रतिनिधी

चाकण औद्योगिक वसाहतीत खराबवाडी (ता. खेड) हद्दीत सारा सिटी ते मर्सिडीज बेंजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अनोळखी युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि.19) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. 

अनोळखी युवकाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित युवकाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पुणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या बाबतची माहिती सकाळी कामावर जाणाऱ्या काही कामगारांनी दिली होती. त्यानंतर नियंत्रण कक्षाने चाकण पोलिसांना सूचित केले होते. त्यानंतर घटनास्थळी चाकण पोलीस दाखल झाले आहेत.  

पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुगणालयात हलविण्यात आला आहे. हा मृतदेह जवळपासच्या भागातील युवकाचा असल्याची शक्यता गृहीत धरून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी सारा सिटीच्या पाठीमागील सारासिटी ते मर्सिडीज बेंझ रस्त्यावर याच भागात एका महिलेचाही खून झाला होता.