होमपेज › Pune › पुणे : कार अपघातात एकजण ठार

पुणे : कार अपघातात एकजण ठार

Published On: May 13 2018 7:56AM | Last Updated: May 13 2018 7:56AMपिंपरी : प्रतिनिधी 

भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावरील खांबाला धडकली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. शिवम जाधव (३८) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालक तरुणाचे नाव आहे. तर हृषीकेश पवार हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात पिंपरी दुभाजक येथे झाला. 

पाचच्या सुमारास मुंबईकडून पुण्याच्या दिशेने एक मारुती एस एक्स 4 (एम एच 04 / ए डी 8461) कार भरधाव वेगात जात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता दुभाजकावरील पोलला धडकली. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला तरुण गंभीर जखमी झाला.