Wed, Jul 17, 2019 19:02होमपेज › Pune › जिल्हा रुग्णालयाविराधोत युवकाचे बेमुदत धरणे

जिल्हा रुग्णालयाविराधोत युवकाचे बेमुदत धरणे

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 1:25AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

भावाच्या मृत्यूनंतर अनुकंपाखाली नोकरी मिळणे अपेक्षित होते. त्याबाबत योग्य कागदपत्रे देण्यात आली, तरी नोकरी देण्यात आलेली नाही. याच्या विरोधात व भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात दीपक कागडा यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्याने सांगितले. 

दीपक यांचा भाऊ नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत होता. त्याच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर घेण्यासाठी दीपकने वारंवार पाठपुरावा केला. कागडा यांच्या भावाने जी कागदपत्रे जमा केली होती, तीच कागदपत्रे दीपक कागडा यांनी देखील प्रशासनाकडे दिली होती. त्यांचे नाव प्रतीक्षा यादीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून समाविष्ट करण्यात आले. कामासाठी मागितलेली रक्कम न दिल्याने प्रतीक्षा यादीतील नाव रद्द करण्यात आले. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने वेळोवेळी प्रतिज्ञापत्र मागितले. त्या-त्या वेळी प्रतिज्ञापत्र देण्यात आले. ही प्रतिज्ञापत्रे आपल्याच विरोधात वापरून नोकरीपासून वंचित ठेवले असल्याचा आरोप कागडा यांनी केला आहे.

ही कागदपत्रे चुकीची असल्याचे देखील रुग्णालयीन प्रशासनाकडून सांगितले जात नाही. शासनाची स्वतः कोणतीही फसवणूक केली नाही. जर केली असेल तर कारवाई करावी, असे सांगून प्रतिज्ञापत्र मागणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवरही कारवाई करावी अशी मागणी त्याने केली आहे.