पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

Last Updated: Oct 08 2019 8:11PM
Responsive image
मृत प्रतिक सातव


पौड : वार्ताहर

लवळे (ता. मुळशी) येथे पूर्ववैमनस्यातून प्रतिक प्रकाश सातव (वय २८) या तरूणाचा पाच जणांकडून धारदार शस्ञांनी वार करून खून करण्यात आला आहे.

लवळे येथील राऊतवाडी ते भरे गावच्या दरम्यान कच्च्या रस्त्यावर प्रतिक आणि त्याचे दोन मिञ नवीन गाडी घेऊन चालले असताना मारेकय्रांनी त्यांच्या नवीन गाडीला ट्रॅक्टर आडवा लावून प्रतिक याला बाहेर काढून त्याच्यावर कोयता आणि तलवारीनी वार केले. यात प्रतिक याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. 

घटनास्थळावरून प्रतिक याचा मृतदेह  पौड येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. प्रतिक सातव याच्यावर पौड पोलिस स्टेशनला मारामारीचे ३२४ आणि ३२५ कलमान्वये दोन गुन्हे दाखल झाले होते. आरोपींची नावे निष्पन्न झालेली असून त्यांच्या अटकेसाठी दोन पथके पाठविण्यात आली असल्याची पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली. घटनास्थळाला हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.