Fri, Feb 22, 2019 20:13होमपेज › Pune › लग्नाआधीच नवरीची गळफासाने आत्महत्या

लग्नाआधीच नवरीची गळफासाने आत्महत्या

Published On: Dec 13 2017 8:45AM | Last Updated: Dec 13 2017 8:45AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

गुरुवारी लग्न असताना लग्नाआधी एका नवरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री पिंपरी येथे घडली.

सीमा दिलीप सकाटे (वय २२, रा. विद्यानगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. १४ डिसेंबर रोजी तिचे लग्न होणार होते. त्यासाठी मंगळवारी तिने मेंहंदीही काढली होती. मात्र, रात्री तिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.  या घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलिस करत आहेत.