Sun, Jan 20, 2019 21:02होमपेज › Pune › इंदापूरमध्ये युवा शेतकर्‍याचा डोक्‍यात वार करून खून

इंदापूरमध्ये युवा शेतकर्‍याचा डोक्‍यात वार करून खून

Published On: Feb 12 2018 11:40AM | Last Updated: Feb 12 2018 11:36AMनिमगाव केतकी : प्रतिनिधी 

रात्री शेताच्या राखणीला निघालेल्या युवा शेतकर्‍याच्या डोक्यात वार करून खून केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे घडली. या घटनेनंतर संतप्‍त नातेवाईकांनी खून करणार्‍याना ताब्यात घेतले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसुन श्वानपथकाला पाचारण करण्याची मागणी करण्यात आली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी हद्दीतील शिखर वळण या ठिकाणी नेहमीप्रमाणे रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच ४२ एई ६२६९) आपल्या शेतात राखणीला निघाले होते, मनोहर विठ्ठल  म्हस्के(वय ३२,रा. भरणेवाडी) यांच्या डोक्यावर वर्मी घाव घालून खून करण्यात आला.

सकाळी शाळेला जाणार्‍या मुलांनी म्‍हस्‍के यांचा वाहनावर पडलेला मृतदेह पाहिल्‍यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर त्यांचे त्यांचे चुलते महादेव कोंडिबा म्‍हस्‍क यांनी पोलिस पाटील यांना कळविले. त्यांनंतर इंदापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ननवरे  यांना कळवून पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे.

गावात हे वृत्त पसरताच घटनास्थळी  मोठी गर्दी  झाली होती. जोपर्यंत श्वान पथक घटनेचा तपास करत नाही तोपर्यंत नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.