Tue, Jul 16, 2019 01:42होमपेज › Pune › धावत्‍या बसमध्ये कोयत्‍याने वार करून तरूणाचा खून

धावत्‍या बसमध्ये कोयत्‍याने वार करून तरूणाचा खून

Published On: Jun 12 2018 11:01AM | Last Updated: Jun 12 2018 11:04AMराजगुरूनगर : प्रतिनिधी

सोशल मीडियावर बहिणीचे अश्लिल फोटो टाकल्यावर पोलिसात विनयभंगाची तक्रार दिल्याचा राग मनात धरून पीडित मुलीच्या भावाचा एसटीत बसलेल्या प्रवाशांसमोरच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. श्रीनाथ सुदाम खेसे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे तर, अजित भगवान कान्हुरकर असे संशयीत आरोपीचे नाव असून, खून करून तो पळून गेला आहे. ही घटना दावडी (ता. खेड) येथे घडली.

या घटनेनंतर नागरिकांनी एसटीसह मृतदेह खेड पोलिस ठाण्यासमोर आणून आरोपीला अटक करण्यासाठी ठीय्या मांडला. फिर्यादी मुलीचे ८ जून रोजी अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलिसांकडून कोणतीच प्रतिबंधात्मक कारवाई झाली नही. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आरोपी मोकाट असल्याने ही घडली घटना. आरोपी कडून फिर्यादीच्या भावाची हत्त्या झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.