Fri, Nov 16, 2018 17:08होमपेज › Pune › पुण्यात दहावीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरून खून

पुण्यात दहावीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरून खून

Published On: Mar 13 2018 8:13AM | Last Updated: Mar 13 2018 8:13AMपिंपरी : प्रतिनिधी 

निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूर्णानगर येथे धारधार हत्याराने वार करुन तरुणाचा खून करण्यात आला. हा प्रकार मगंळवारी पहाटे दीडच्या सुमारास घडला.

वेदांत भोसले (२२, रा. पूर्णानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पहाटे दिडच्या सुमारास त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर आणि कारण अद्याप स्पष्ट झाले नसून निगडी पोलिस शोध घेत आहेत. जखमी वेदांत याला नागरिकांनी रुग्णालयात दखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

वेदांत भोसले याच्या गळ्यावर धारधार शस्त्राने गळा, मान व डोक्यात सपासपा वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वेदांत नगर निगडी येथील अमृता विद्यालयात दहावीत शिकत होता. त्याची दहावीची परीक्षा सुरू होती. दरम्यान, त्याची हत्या का करण्यात आली? यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिस याप्रकरणी चौकशी करत आहेत