Mon, Apr 22, 2019 05:41होमपेज › Pune › पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून

Published On: Apr 23 2018 9:26AM | Last Updated: Apr 23 2018 9:26AMपुणे : प्रतिनिधी

पूर्ववैमनस्यातून तरुणाला मध्यरात्री मोकळ्या जागेट नेहून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर भागात ही घटना घडली आहे. विशाल मारुती कदम (वय, 27, मांजरी, हडपसर) असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. 

याप्रकरणी हरी उर्फ हऱ्या बबन खुडे याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल तुपारे (28) यांनी फिर्याद दिली आहे. 

आरोपी खुडे आणि मयत कदम यांच्यात या पुर्वीवादही झाला होता. त्यानंतर त्यांचे भांडन मिटविण्यात आले होते. मात्र, खुडे याच्या मनात कदम बद्दल राग होता. त्याने रविवारी रात्री त्याला बोलवून घेतले. त्यानंतर मांजरी भागात एका मोकळ्या फ्लॅटवर नेहून लोखंडी रॉडने कदमच्या डोक्यात व माणेर घाव घालून त्याचा निर्घृण खून केला. सकाळी हा प्रकार लक्षात त्यानंतर खुडे याला शोध घेण्यात आला. परंतु, तो सापडला नाही. 
 

Tags :  pune district, hadpsar, young boy,  murder