Sun, Jan 20, 2019 00:03होमपेज › Pune › 'इन्स्टाग्राम’वर कारचे ‘स्पीड’ दाखवणे जिवावर बेतले

'इन्स्टाग्राम’वर कारचे ‘स्पीड’ दाखवणे जिवावर बेतले

Published On: May 14 2018 9:32PM | Last Updated: May 14 2018 9:32PMपिंपरी : प्रतिनिधी  

आपण किती भरधाव वेगात कार चालवतो हे मित्रांना ‘इन्स्टाग्राम’वर ‘लाइव्ह’ दाखवणे तरुणाच्या जिवावर बेतले. रविवारी पहाटे पिंपरी ग्रेड डिव्हायडर हा अपघात घडला आहे. 

या अपघातात शिवम जाधव या तरुणाचा मृत्यू झाला तर शिवमचा आतेभाऊ हृषिकेश पवार हा गंभीर जखमी झाला आहे. शिवम हा आपला आतेभाऊ हृषिकेशसोबत कारने निघाला होता. पिंपरीच्या दिशेने जात असताना शिवम वेगात कार चालवत होता. आपण किती वेगात कार चालवत आहे, हे त्याला आपल्या मित्रांना दाखवायचं होतं. यासाठी त्याने ह्रषिकेशला आपला मोबाइल दिला आणि ‘इन्स्टाग्राम लाइव्ह’ करण्यास सांगितलं. ‘लाइव्ह’ सुरु असताना नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून अपघात झाला. यामध्ये शिवमचा जागीच मृत्यू झाला. तपास पिंपरी पोलिस करत आहेत.