Sat, Aug 24, 2019 21:37होमपेज › Pune › प्राध्यापक भरतीवरील बंदी उठणार :  विनोद तावडे 

प्राध्यापक भरतीवरील बंदी उठणार :  विनोद तावडे 

Published On: Jul 02 2018 5:52PM | Last Updated: Jul 02 2018 5:52PMपुणे :  प्रतिनिधी 

राज्यात महाविद्यालयातील प्राचार्य भरतीवरील बंदी उठविण्यात आली आहे. तर प्राध्यापक भरती उठविण्याबाबतचे काम अतिंम ठप्यात सुरु आहे. त्यामुळे लवकरच प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविण्यात येईल. तसेच तासिका बेसीस वर दिले जाणारे मानधन आहे, ते वाढविण्यासाठी शासन विचार करत असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी आले असता तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

पालकांच्‍याकडून सिंहगड संस्थेच्या महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया बंद करण्याची मागणी

सिंहगड एज्येकशन सोसायटी आणि प्राध्यापकांमध्ये थकीत वेतनासाठी गेल्या वर्षी पुकारलेल्या असहकार आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला असून अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाचे सुमारे ३० टक्के विद्यार्थी नापास झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सिंहगड संस्थेच्या महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया बंद करण्याची मागणी पालकांसह संघटनांद्वारे केली जात आहे.

यावेळी तावडे म्हणाले, सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. एखादे प्रकरण न्यायपालिकेत प्रलंबित असल्यास राज्य सरकारला यामध्ये काहीही करता येत नाही. मात्र, विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना महाविद्यालयांच्या अवस्थेसंबंधी मार्गदर्शन केले जाते. तसेच राज्य सरकारच्या हातामध्ये जे आहे ते केले जात आहे.

 ऑनलाईन शिक्षक भरतीबाबत ग्राम विकास खात्याने नक्की जागा किती आहेत, हे शिक्षण विभागाला कळविले आहे. या जाग्यांच्या मान्यत्या घेऊन पुढील पंधरा दिवसात आम्ही पवित्र पोर्टलद्वारे विद्यार्थी माहिती भरत आहेत. त्यांची तपासणी केली जात आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्यासह सर्व खात्याने रिक्त जागा कळविल्या की आठ दिवसात याबाबत निर्णय घेण्यात येईल.


मनमानी करणार्‍या शाळांवर कारवाई 

राज्यातील काही खाजगी इंग्रजी शाळा शिक्षण हक्क कायद्याला हरताळ फासत विद्यार्थ्यांना नापास करत आहेत. याबाबत शाळांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्यास शाळांवर कारवाई करण्यात येईल. तसेच शुल्क नियमन कायद्याला कडक करण्याचे काम अतिंम ठप्यात आले असून या अधिवेशनात या कायद्याबाबत घोषणा करण्यात येणार असल्‍याचे तावडे यांनी सांगितले.