होमपेज › Pune › 'त्या' महिलेचा मृत्यू संशयास्पद; घातपाताची शक्यता 

'त्या' महिलेचा मृत्यू संशयास्पद; घातपाताची शक्यता 

Published On: Jul 25 2018 4:09PM | Last Updated: Jul 25 2018 4:09PMपिंपरी : प्रतिनिधी 

थेरगाव येथील बंधाऱ्यात रविवारी (दि.२२) सकाळी  सापडलेल्या अनोळखी महिलेची ओळख फेसबुकमुळे पटली आहे. ती महिला निगडी ओटास्किम येथील रहिवासी असून तिच्यावर देखील काही गुन्हे नोंद असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे 'त्या' महिलेचा घातपात झाला असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

याबाबत महिलेच्या भावाच्या सांगण्यानुसार, गुरुवारी (दि.१९) रात्री आठच्या सुमारास तिला एक मित्र भेटण्यास आला होता. त्या दिवशी ती रात्रभर घरी आली नाही. तेव्हा भावाने देहूरोड येथील तिच्या मित्राकडे चौकशी केली असता त्या मित्राने सांगितले कि, तिच्या दुसऱ्या तीन मित्रांसह ती महिला देहूरोड येथील एका 'वाईन्स शॉप' मधून बियरचा बॉक्स घेऊन गेली होती. महिलेच्या भावाने त्या मित्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते देखील फरार झाले आहेत. त्यामुळे सध्या हे प्रकरण एका वेगळ्या वळणावर येऊन थांबले आहे. पोलीस त्या मित्रांचा शोध घेत आहे.