Sat, Aug 17, 2019 16:13होमपेज › Pune › पुणे : कणिक मळणी यंत्रात ओढणी अडकून महिला गंभीर

कणिक मळणी यंत्रात ओढणी अडकून महिला गंभीर

Published On: Apr 09 2018 8:17PM | Last Updated: Apr 09 2018 8:18PMपुणे : प्रतिनिधी 

शहरातील गोखले नगर येथे कणिक मळण्याच्या यंत्रात ओढणी अडकून महिला त्यात ओढली गेल्याने गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जखमी महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुप्रिया संदिप प्रधान (४०, गोखले नगर) असे जखमी महिलेचे नाव आहे. 

सुप्रिया प्रधान या खानावळ (मेस) चालवितात. त्यांच्याकडे कणिक मळण्याचे यंत्र आहे. सोमवारी सायंकाळी त्या काम करत असताना अचानक त्यांची ओढणी यंत्रात अडकली. त्यानंतर त्यांचा चेहरा पुर्णपणे यंत्रात ओढला गेला. यामध्ये त्यांच्या चेहर्‍याला गंभीर मार लागला. त्यांनी आरडाओरडा केल्याने काही वेळात शेजारी तेथे आले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

Tags : pune, pune news, dow making machine