Sat, Nov 17, 2018 10:20होमपेज › Pune › अकराव्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या

अकराव्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या

Published On: Feb 10 2018 1:53AM | Last Updated: Feb 10 2018 1:20AMवाकड : वार्ताहर 

काळेवाडीफाटा येथील पार्क स्ट्रीट सोसायटीतील इमारतीच्या 11व्या मजल्यावरून उडी मारून संगणक अभियंत्या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. 

पल्लवी उदयन मुजुमदार (30) असे या महिलेचे नाव आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी ही हिंजवडीतील एका आयटी कंपनीत कामास होती. ती शुक्रवारी आपल्या आजारी मुलास दवाखान्यात घेऊन गेली होती. 

दवाखान्यातून घरी परत आल्यानंतर तिने इमारतीच्या 11व्या मजल्यावरील डक्टमधून उडी मारून आत्महत्या केली. तिचे पतीदेखील एका आयटी कंपनीत कामास आहेत. आत्महत्येचे  नेमके  कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. वाकड पोलिस तपास करीत आहेत.