Sat, Feb 16, 2019 18:52होमपेज › Pune › महिला पोलिस अधिकाऱ्यास 37 हजारांची लाच घेताना पकडले

महिला पोलिस अधिकाऱ्यास 37 हजारांची लाच घेताना पकडले

Published On: Dec 06 2017 10:02PM | Last Updated: Dec 06 2017 10:02PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकासह 37 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पुणे पोलिस दलातील केवळ दीड महिन्यातील हा तिसरी घटना असून, तिन्ही घटनेत अधिकाऱ्यांना पकडण्यात आले आहे.

महिला उपनिरीक्षक साळुंखे असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तक्रारदार यांच्या विरोधात वारजे पोलिस ठाण्यात तक्रार आली असून, यावर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली आहे.