Mon, Apr 22, 2019 16:29होमपेज › Pune › रुग्ण महिलेवर जादूटोणा करणारा मांत्रिक अटकेत

रुग्ण महिलेवर जादूटोणा करणारा मांत्रिक अटकेत

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 12:11AMपुणे : प्रतिनिधी 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेवर जादू टोण्याचा उपयोग करून उतारा करणार्‍या मांत्रिकाला अलंकार पोलिसांनी अटक केली. त्याला 17 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण हा अद्याप फरार आहे. 

सचिन सदाशिव येरवडेकर (वय 48, रा. 306, कसबा पेठ) असे पोलिस कोठडी झालेल्या मांत्रिकाचे नाव आहे. अंधश्रध्देला चालना देणार्‍या डॉ. सतीश चव्हाण याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. संध्या गणेश सोनवणे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप (22, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी डॉ. चव्हाण आणि मांत्रिक येरवडेकर यांच्यावर गुन्हा दाखाल केला आहे. ही घटना 20 फेब्रुवारी ते 11 मार्च 2018 या कालावधीत स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली.