Thu, Feb 21, 2019 21:21होमपेज › Pune › पुणे : नवर्‍याने टाकले..नवजात बालकासह मातेच्या नशिबी 'फूटपाथ'!

पुणे : नवर्‍याने टाकले..नवजात बालकासह मातेच्या नशिबी 'फूटपाथ'!

Published On: May 21 2018 9:28PM | Last Updated: May 21 2018 9:28PMभवानीपेठ, पुणे : मोहिनी मोहिते

फूटपाथ हा सामान्य नागरिकांना चालण्यासाठी असतो. मात्र काही वेळा तो आयुष्यात भरकटलेल्या लोकांचा निवाराही बनतो. याच फूटपाथवर पैशाऐवजी भाकरीसाठी हात पसरणारे लोक आपल्या नजरेस पडतात. पुण्यातील स्वारगेटच्या चौकातील फूटपाथवर आढळून आला. ताई एक भाकरी मिळेल का? खूप भूक लागली आहे.. शेजारून एक अचानक आवाज आला..त्यात उन्हाळ्याचा तडाखा.. स्वारगेटच्या सिग्‍नलला थांबले होते... तेव्हा शेजारून येणार्‍या आवाजामुळे माझे लक्ष भरकटले.. मी पाहिले तर एक बाई एका लहानग्या तान्ह्या बाळाला उराशी घेऊन व सोबत एका चार ते पाच वर्षाच्या लहान मुलाला हाताला पकडून फूठपाथजवळ उभी होती. साधारण वय २५ ते ३० वर्ष असलेल्या आसपासची ती महिला होती. साडी निटनेटकी नेसलेल्या अवस्थेत असल्यानं मला ती भिकारी वाटली नाही. तरीदेखील लहान बाळाकडं बघून मला राहावेना म्हणून मी गाडी एका बाजूला पार्क करून तिला पाकिटातून २० रूपये काढून दिले.

श्‍वेता मनोहर पाटील असे त्या महिलेचं नाव. नुकतीच वीस दिवसांची बाळंतीण असलेली श्‍वेता आपल्या तहानुल्या बाळाला घेऊन रस्त्यावरच आपला संसार करतेय. आई वडील दोघेही मरण पावल्याने माझं म्हणण्यासारखं कोणीच नाही. यावेळी तिनं सांगितलं की, मी रस्त्यावरच बांळतीण झाले. या भागात राहणार्‍या पारधी समाजातील काही महिलांनी माझं बाळतंपण केलं. माझ गाव मुरूड कोळीवाडा येथे आहे. मातीचं घर असल्याने ढिगार्‍याखाली गेलं आणि त्यात नवर्‍यानं दुसरं लग्न केलं. म्हणून संतापानं घर सोडून मिळेल त्या वाटेने प्रवास करत इथपर्यंत पोहचले. गेल्या सहा महिन्यापासून फूटपाथवर राहतेय. रस्त्यावरून येता जाता काही जण देतील तेच अन्न खातेय.  पुन्हा त्या नवर्‍याकडे जाण्याची कोणतीच आशा नाही, असे सांगताना तिचे डोळे पानावले. 

श्रेयस नावाचा चार वर्षाचा मोठा मुलगा आणि २० दिवसांची गोंडस चिमुकली पाहुन कोणाचाही कंठ दाटून येईल अशी ती परिस्थिती. यावेळी त्यांनी सांगितलं की, रात्री अपरात्री भितीपोटी झोप येत नाही. मात्र शेजारीच पारधी समाजाचे लोकही रस्त्यावर राहत असल्यानं त्यांचाच आधार घेऊन जगतेय. 

हा सगळा प्रसंगच जणू सुन्‍न करणारा. पुण्यासारख्या शहरात असे कित्येकजण फूटपाथवरच पोटाची खळगी भरतात आणि निवाराही तिकडेच शोधतात. परंतु, २० दिवसांची चिमुकली आणि चार वर्षाच्या मुलासह मातेवर ओढावलेली हे वेळ समाजातील कुप्रथेत महिलांसह बालकांचा बळी घेणारी वाटते.

Tags :pune, pune news, footpath, newborn,