Wed, Jul 15, 2020 14:59होमपेज › Pune › वाईनशॉपच्या मालकाला कोयत्याच्या धाकाने लुटले

वाईनशॉपच्या मालकाला कोयत्याच्या धाकाने लुटले

Last Updated: May 25 2020 4:23PM

संग्रहित छायाचित्रपुणे : पुढारी वृत्तसेवा

दुचाकीवरून घरी निघालेल्या वाईनशॉपच्या मालकासह मॅनेजरला कोयत्याच्या धाकाने पाच जणांनी लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात सुहास दगडोबा निगडे (वय.४२, गोकूळनगर कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात पाच जणांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडला आहे. यावेळी आरोपींनी दोघांच्या खिशातील रोकड व मोबाईल असा ७० हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.

वाचा :बारामती तालुक्यात आणखी एक कोरोनाग्रस्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुहास निगडे आणि त्यांच्या वाईनशॉपमधील मॅनेजर संदेश कुंभार हे दोघेजण दुचाकीवरून रविवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अपर डेपोच्या पाठीमागील रोडने घरी निघाले होते. दरम्यान, अत्तार सप्लायर्स बिल्डिंग मटेरियलच्या दुकानासमोर आले असता, पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी त्यांना अडविले. त्यानंतर दोघांनाही कोयत्याचा धाक धाखवून निगडे यांच्या खिशातील २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल तर मॅनेजरच्या खिशातील ५० हजारांची रोकड असा, ७० हजारांचा किंमती ऐवज चोरी करून पोबारा केला. पुढील तपास गुन्हे निरीक्षक मुरलीधर खोकले करीत आहेत.

वाचा :गडद संकटाची चाहुल; राज्य सरकारने थेट केरळमधून डॉक्टर, परिचारिका मागवल्या!