Fri, Jul 19, 2019 00:55होमपेज › Pune › वाईन शॉप चालकाला अडवून साडे तीन लाखाची रोकड पळवली

वाईन शॉप चालकाला अडवून साडे तीन लाखाची रोकड पळवली

Published On: May 07 2018 8:58AM | Last Updated: May 07 2018 8:57AMपुणे : प्रतिनिधी

वाईन शॉप बंदकरून दुचाकीवर निघालेल्या वाईन शॉप चालकाच्या दुचाकीसमोर गाडी आडवी लावून साडे तीन लाख रुपयांची रोकड पळविल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव पार्क परिसरात घडला. याप्रकरणी व्यकंट रमण (59) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

रमण यांचे लष्कर भागात वाईन शॉपचे दुकान आहे. ते रात्री दुकान बंद करून घरी जात होते. त्यावेळी बनगार्डन रोड ते पेट्रोल पंप चौकादरम्यान पाठीमागुन आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या दुचाकीच्यासमोर गाडी आडवी मारली. ते थांबल्यानंतर दुसऱ्या दुचाकीवर आलेल्यांनी पाठीला अडकवलेली साडे तीन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवली.  याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

Tags : win shop, owner, 3 and half lakh, stolen, pune news