Mon, Jul 15, 2019 23:43



होमपेज › Pune › मुलांना घरात घेतल्याच्या कारणावरून पत्नीची हत्या

मुलांना घरात घेतल्याच्या कारणावरून पत्नीची हत्या

Published On: Apr 26 2018 11:52AM | Last Updated: Apr 26 2018 11:52AM



पुणे : प्रतिनिधी

मुलांना घरात घेण्यास मनाई केलेली असताना पत्नीने मुलांना घरात घेतल्याच्या कारणावरून पतीने स्टीलचे भांडे डोक्यात मारून खून केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पतीला पोलिसानी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात सुधा रवी केसरी (वय ४५) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. रवी नंदलाल केसरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.