Sat, Jul 20, 2019 15:24होमपेज › Pune › पत्नीला जाळण्याचा प्रयत्न 

पत्नीला जाळण्याचा प्रयत्न 

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:09AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

17 वर्षीय मुलीला ‘तू मोबाईल वापरायचा नाही’ असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर पत्नीने रोखले. या  रागातून पत्नीला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड परिसरात ही घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. दरम्यान माहेराहून  5 लाख रुपये घेऊन यावे, यासाठीही पत्नीचा सासरच्यांकडून छळ केल्याचे  तक्रारीत म्हटले आहे. 
राहुल शंशिकांत भोसले (वय 42, रा. निलेश अपार्टमेंट, वडगांव, सिंहगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पत्नी ज्योती भोसले (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल व ज्योती यांचे 20 वर्षापूर्वी लग्न झालेले आहे. त्यांना 17 वर्षाची जानव्ही व 7 वर्षाचा मुलगा आहे.  राहुल याचा मार्केटयार्ड परिसरात गाळा असून, तेथे तो भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. दरम्यान मुलगी जानव्ही मोबाईल वापरते. त्यामुळे रविवारी सायंकाळी जानव्हीने मोबाईल घेतला असता वडिल राहुल याने तिला तू मोबाईल वापरायचा नाही, असे म्हणत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पत्नी ज्योती यांनी मुलीला मारहाण करू नका, असे म्हणाल्या. त्यावेळी राहुल याने पत्नी ज्योती यांना काठीने मारहाण करत अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ज्योती यांना माहेरहून 5 लाख रुपये घेऊन यावे, म्हणून वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी  तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.