होमपेज › Pune › पत्नीने पैसे मागितल्याने ४ महिन्याच्या मुलाला आपटले

पत्नीने पैसे मागितल्याने ४ महिन्याच्या मुलाला आपटले

Published On: May 02 2018 9:51AM | Last Updated: May 02 2018 12:23PMपिंपरी : प्रतिनिधी 

दारू प्यायला पैसे ठेवले असताना ते पैसे पत्नीने मागितल्याच्या कारणावरून वडिलांनी स्व:ताच्या चार महिन्यांच्या मुलाला जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 

दत्ता अनिल देशमुख (३४, रा. भारतनगर पिंपरी) असे अटक केलेल्या पित्याचे नाव आहे. शुभांगी दत्ता देशमुख (२२ रा. लक्ष्मी हॉल, आंबेडकर नगर, पिंपरी) हिने याबाबत फिर्याद दिली. पती दत्ता देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.३०) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शुभांगी यांनी आपले पती दत्ता यांच्याकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. मात्र दारू पिण्यासाठी पैसे हवे असल्याने पतीने पैसे देण्यास नकार दिला. यातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले, त्यामुळे चिडलेल्या दत्ताने मुलाला हिसकावून जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

Tags : wife, cash, husband, Dismantling, child, police crime, pune news