Wed, Jan 23, 2019 08:35होमपेज › Pune › पुणेः थेरगावकरांना रखरखत्या उन्हात पावसाचा आनंद 

पुणेः थेरगावकरांना रखरखत्या उन्हात पावसाचा आनंद 

Published On: Apr 30 2018 3:08PM | Last Updated: Apr 30 2018 3:08PMवाकड : वार्ताहर 

येथील थेरगाव-डांगे चौक रस्त्यावर जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला. भर रस्त्यावर पाण्याचे ऊंचच्या-उंच फवारे उडत असल्यामुळे थेरगावकारांना रखरखत्या उन्हात पावसाचा आनंद घेता आला. 

यावेळी अंगाची झालेली काहिली शांत करण्यासाठी दुचाकीस्वार पाण्याचे फवारे अंगावर घेताना दिसत होते. उंच उडणारे फवारे पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. काही वेळातच महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाणी बंद केले परंतु, तोपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते.