Fri, Jul 19, 2019 01:08होमपेज › Pune › खडकवासला साखळीतील पाण्यात घट

खडकवासला साखळीतील पाण्यात घट

Published On: Apr 20 2018 1:16AM | Last Updated: Apr 20 2018 12:19AMखडकवासला : वार्ताहर

 पुणे शहर व परिसरासह जिल्ह्यातील जवळपास एक कोटी नागरिकांची तसेच हजारो हेक्टर शेतीची तहान भागविणारया खडकवासला धरणसाखळीतील पाणी साठयात वेगाने घट सुरू आहे.पाणलोट क्षेत्रात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे.  शेती तसेच पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा केला जात असल्याने गेल्या महिनाभरात चार  टिएमसी पाण्याची घट झाली आहे. धरणसाखळीत अवघे 36.56  टक्के म्हणजे 10.66 टक्के इतके पाणी उरले आहे . त्यात दर तासागणिक घट सुरू आहे. धरणसाखळीतील सर्वात मोठे वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय ) धरण कोरडे पाडण्याच्या मार्गावर आहे. वरसगाव मध्ये केवळ 20.24 टक्के म्हणजे  2 .59  टक्के इतके पाणी आहे. वरसगाव मधून 1600 क्युसेक्स वेगाने खडकवासलात पाणी सोडले जात आहे. या प्रमाणानुसार खडकवासलातून शेतीसाठी मुठा कालव्यात पुर्ण क्षमतेने 1401  क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. या शिवाय पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात खडकवासलातून पाणी पुरवठा केला जात आहे. 

पानशेत (नरवीर तानाजी सागर) धरणात 6.46 टिएमसी म्हणजे 60.63 टक्के इतका पाणी साठा आहे. त्यामुळे आगामी काळात वरसगाव नंतर पानशेत धरणातील पाण्यावरच पाणी पुरवठा अवलंबून राहणार आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत खडकवासला धरणसाखळीत दिड टिएमसी जादा पाणी साठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 19 एप्रिल 2017 रोजी धरणसाखळीत 9.59 टक्के म्हणजे 33.88 टक्के इतका पाणी साठा होता. 

शेतासाठी उन्हाळी आवर्तनाचे पाणी मे महिन्यातही सोडले जाणार आहे. त्यामुळे पाणी साठयात वेगाने घट होणार आहे. वेळेवर पाऊस न पडल्यास जुन _जुलै महिन्यात पाणी टंचाई ची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जुलै अखेर पर्यंत पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी साठा धरणसाखळीत राखीव ठेवण्यात येणार आहे. असे खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागिय अभियंता आर. बी. व्यवहारे यांनी सांगितले. 

 महापालिका जादा पाणी घेत असल्याने   पालिकेने  पाणी कपात करावी असा तगादा  जलसंपदा विभागाने  अद्यापही  सुरू ठेवला  आहे. जलसंपदा च्या तगादयाला महापालिका  जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही गरजे इतके मंजूर 1350 ते 1400 दशलक्ष मीटर इतके पाणी  खडकवासलातून घेत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तर खडकवासला जलसंपदा विभागाचे म्हणणे पालीका 1550 ते 1600 दशलक्ष मीटर इतके पाणी दररोज घेत आहे. असे असले तरी दुसरी कडे खडकवासला धरणसाखळीतील पाणी साठयात वेगाने घट सुरू आहे. कडक उन्हा मुळे पाण्याचे वाढलेले बाष्पीभवन व मुठा कालव्यातून होणारी गळती या आगामी अडीच तीन महिन्यातच जवळपास दोन टिएमसी पाण्याचा फटका बसणार आहे.