Fri, Apr 19, 2019 07:58होमपेज › Pune › सुरक्षा रक्षकाचा खून हाकलून दिल्याच्या रागातून

सुरक्षा रक्षकाचा खून हाकलून दिल्याच्या रागातून

Published On: Jan 31 2018 10:34AM | Last Updated: Jan 31 2018 10:34AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या सुरक्षा रक्षकाचा खूनाचा उलगडा करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. केवळ मुलाला हाकलून दिल्याच्या रागातून बापाने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

शकील बाबू तांबोळी (वय ३५) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे मारेकरी व्यक्तीचे नाव आहे. आरिफ पठाण (वय ४५) असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. 

शकील बाबू तांबोळी हे आरिफ पठाण ज्या शोरूममध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोरकीस आहेत. त्याच ठिकाणी पूर्वी नोकरीस होता. त्यामुळे त्यांचा मुलगा त्याचे वडील रशीद येथे आले आहेत का? हे पाहण्यासाठी गेला होता. मात्र, त्यावेळी आरिफ पठाण यांनी मुलाला दारूच्या नशेत येथे कोणी आले नाही असे म्हणत हाकलून दिले. त्याचा राग आल्याने त्याने परत जाऊन वडिलांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर तांबोळी हे चाकू घेऊन आले आणि झोपेत असणाऱ्या आरिफ पठाण यांच्यावर वार करून त्यांचा खून केला, असे तपासात समोर आले आहे.