Fri, Jul 19, 2019 17:53होमपेज › Pune › वारकरी संप्रदायाचे विचार, परंपरा आदर्शवत : शास्त्री

वारकरी संप्रदायाचे विचार, परंपरा आदर्शवत : शास्त्री

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 12:06AMधनकवडी : प्रतिनिधी

वारकरी संप्रदायाची विचार परंपरा,भगवी पताका घेऊन निष्ठने अविरत वारी करणार्‍या ज्येष्ठ वारकर्‍यांचा सेवेचा गौरव हाच खरा परमार्थ होय.सुख दुःखाचा विचार न करता सर्वस्व परमात्म्याला मानुन 41 वर्षे वारी करणारे तनपुरे गुरूजी यांना सन्मान देताना आनंद होत आहे असे उद‍्गार  महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांनी व्यक्त केले.

दिव्य ध्यास चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ह. भ. प. संपत तनपुरे गुरूजी यांना निष्ठावान वारकर्‍यांचा वारकरी जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ अध्यात्मिक गुरू योगीराज भाऊ महाराज परांडे यांचाही त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेवक विशाल तांबे, आप्पासाहेब रेणुसे, अश्‍विनी भागवत, सर्जेराव शिळीमकर, दादा डिंबळे, ह. भ. प. कृष्णाजी रांजणे, प्रशांत निगडे, संभाजी कोकाटे उपस्थित होते.

सदगुरू  तुकोबाराय पावनधाम संस्थानची दिंडी चंद्रभागानगर येथील महापालिकेच्या शाळा क्र.162 येथे विसावते.संस्थानचे संस्थापक महंत बोराडे शास्त्रीजी यांच्या प्रेरणेने व ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे प्रमुख सचिन डिंबळे व मित्रपरिवाराच्या वतीने वारकर्‍यांची सेवा केली जाते.