Mon, Jun 24, 2019 20:57होमपेज › Pune › तिने पतीवरच केले ‘हॅक्सॉ ब्लेड’ने वार!

तिने पतीवरच केले ‘हॅक्सॉ ब्लेड’ने वार!

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 17 2018 1:05AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पत्नी विभक्त राहत असल्याने मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या पतीवर आईच्या मदतीने पत्नीने हेक्सॉ ब्लेडने वार करून त्याला जखमी केल्याचा प्रकार भोसरी येथे मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडला.

नारायण मोहन तावरे (30, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे जखमी पतीचे नाव आहे. त्याने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पत्नी आरती नारायण तावरे (26, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सासू सुमन हरिदास बोबडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण व त्याची पत्नी आरती गेल्या काही महिन्यापांसून विभक्त राहत आहेत. आरती ही मुलांसह आई सुमनकडे बालाजीनगर झोपडपट्टीत राहते.  

नारायण हा मुलांना भेटण्यासाठी सासरी गेला असता त्यांच्यात वाद झाले. या वेळी सासूने नारायण यांना धरून ठेवले, तर आरतीने हेक्सॉ ब्लेडने छातीवर वार केले. सध्या नारायण यांच्यावर ‘वायसीएम’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपास भोसरी पोलिस करत आहेत.