Mon, Apr 22, 2019 12:05होमपेज › Pune › ‘गॅस एजन्सी’कडून ग्राहकांची लूट

‘गॅस एजन्सी’कडून ग्राहकांची लूट

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 12:29AM

बुकमार्क करा
वाघोली : वार्ताहर

वाघोली येथे गॅस एजन्सीकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. मात्र संबधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. गॅस एजन्सीकडून होणारी लूट थांबवावी अशी मागणी होत आहे. वाघोली येथील गॅस एजन्सीकडून ग्राहकांना एका सिलेंडर मागे आठ ते अठरा रुपये जास्तीचे आकारले जात आहेत. अत्यावश्यक गरज म्हणून ग्राहक निमूटपणे सहन करताना दिसून येत आहेत. एखाद्या ग्राहकाने किंमती पेक्षा जास्त पैसे आकारणी बाबत विचारणा केल्यास, त्याला दोन रुपये सुटे मागितले जातात. प्रत्येक ग्राहकांकडे दोन रुपये सुटे असतीलच असे नाही, याबाबीचा फायदा घेत कंपनीला हिशोभ द्यावा लागतो म्हणून लूट केली जात आहे. 

एका सिलेंडरची किंमत 732 आहे. मात्र ग्राहकांकडून सर्रास 740 ते 750 रू. आकारणी केली जात आहे. खरे तर एजन्सीने सुटे पैसे ठेवणे आवश्यक असताना ग्राहकांनाच सुट्या पैशाची मागणी केली जात आहे. गॅस ही महत्वाची गरज असल्यामुळे बहुतांश ग्राहकही वाद न करता निमूटपणे आर्थिक भुर्दंड सहन करून आपली गरज भागवतात, याचाच फायदा एजन्सी धारक घेत आहेत. वाघोली नव्हे तर ठरवून दिलेल्या  क्षेत्राबाहेर देखील सिलेंडर विक्री केली जात असल्याचे चित्र दिसून येते.  घरगुती सिलेंडरचा वापर सर्रास अनेक व्यावसायिक, हॉटेल चालक करत असतानाचे वास्तव आहे. वाघोली मधील गॅस एजन्सीजकडून वाघोली बाहेरील गावांमध्ये छोट्या वाहनांद्वारे सर्रास विक्री चालू असल्याचे दिसून येते. संबधित अधिकार्‍यांचे याकडे लक्ष नसल्यामुळे की सलगी असल्यामुळे लुटीचे प्रमाण वाढले आहे की काय असा प्रश्‍न नागरिकांना पडतो आहे.