Tue, Sep 25, 2018 14:41होमपेज › Pune › तुमची शाल माझ्या खांद्यावर टाका, विश्‍वजितचे भावनिक आवाहन 

तुमची शाल माझ्या खांद्यावर टाका, विश्‍वजितचे भावनिक आवाहन 

Published On: May 01 2018 7:54PM | Last Updated: May 01 2018 7:54PMपुणे : प्रतिनिधी

डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगलीतील पलूस विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून तेथे डॉ. विश्‍वजित कदम अर्ज भरणार आहेत. या पलूस जागेच्या वाटपासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सध्या चर्चा सुरु आहे. या चर्चेचा सूर पकडत तुमची शाल माझ्या खांद्यावर टाका असे भावनिक आवाहन डॉ. विश्‍वजितने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना केले.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पुरस्कार वितरणामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते तर डॉ. विश्‍वजित कदम यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जयंत पाटील यांना पोहोचण्यास उशीर झाल्याने काही पुरस्कार वितरण करण्यात आले. पाटील आल्यानंतर राहिलेले पुरस्कार त्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या पुरस्कारातील शालींचा धागा पकडत विश्‍वजितने आपल्या भाषणात जयंत पाटील यांनाच अप्रत्यक्ष गळ घातली. तुम्हाला कार्यक्रमाला उशीर झाला असला तरी राहिलेल्या काही शाल असतील त्या माझ्या खांद्यावर टाका, त्याचा मला नक्कीच फायदा होईल, असे आवाहन केले.