Wed, Sep 18, 2019 21:52होमपेज › Pune › तिसरे विश्व वेद विज्ञान संमेलन आजपासून

तिसरे विश्व वेद विज्ञान संमेलन आजपासून

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 12:41AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी  

राज्य सरकार, विज्ञान भारती, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ आणि गोवा सरकारच्या वतीने तिसरे विश्व वेद विज्ञान संमेलन आज बुधवार दि. 10 ते 13 जानेवारी दरम्यान डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आले आहे. 

वेद विज्ञान सृष्टी या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. शिक्षणविषयक सभेची सुरुवात दुपारी 11 वाजता करण्यात येणारआहे. तर दुपारी 4 वाजता वेदिक विज्ञान व आधुनिक विज्ञान या कार्यक्रमात डॉ. विजय भटकर मार्गदर्शन करणार असून डॉ. विश्वनाथ कराड अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता आनंदमुर्ती गुरू मा यांचे प्रवचन होणार असल्याची माहिती डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

दुसर्या दिवशीच्या सत्रांचे उद्घाटन गुरुवारी सकाळी 10 वाजता प्रा. वसंत शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी व स्वामी तेजोमनयानंद मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. विजय भटकर, जयंत सहस्त्रबुध्दे, सुरेश सोनी, प्रा. ए. पी. जामखेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शुक्रवार दि. 12 रोजी सकाळी साडेसात वाजता सूर्यनमस्कार सहपरिवार हा कार्यक्रम होणार आहे.