Wed, Apr 24, 2019 07:38होमपेज › Pune › ‘मानवी हक्कांबाबत तरतुदी असतानाही त्याचे उल्लंघन’

‘मानवी हक्कांबाबत तरतुदी असतानाही त्याचे उल्लंघन’

Published On: Dec 10 2017 12:55PM | Last Updated: Dec 10 2017 12:55PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

मानवी हक्क बाबत तरतुदी असतानाही त्याचे उल्लंघन होत आहेत. त्याबाबत जनजागृती करण्याचे काम आम्ही करीत आहोत, असे मत संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी व्यक्त केले. मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेतर्फे जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त 'शांती, समता, सद्भावना, जनजागृती' पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

या पदयात्रेत महात्मा फुलेंच्या वेशभूषेत शौर्य शहाणे, सावित्री बाईंच्या वेशभूषेत स्तुती डहाळे तसेच नगरसेविका आरती कोंडरे, संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, सतीश लालबिगे, सोमनाथ सावंत, विकास घोल, प्रा. मोरेश्वर नेरकर, प्रा. मीना रणपिसे, डॉ. अभिषेक हरिदास, नितीन लोखंडे सहभागी झाले होते. 

मानवी हक्क दिनानिमित्त सर परशुरामभाऊ महाविद्यालयातर्फे मानवी हक्क बाबत महत्‍व सांगणारे पथनाट्य सादर करण्यात आले. यामध्ये मुकुल साने, राहुल गाजरे, अनिकेत करपे, चैतन्य वैरागडे, हिमांशू पिल्ले, हिमांशू पाटील, देविका सरदेशपांडे, वर्षा कुलकर्णी, प्रीती माने, ओंकार घोलप, रोहन भालेराव, निखिल कानडे, अनिकेत दुर्वे सहभागी झाले होते.