Tue, Nov 20, 2018 19:23होमपेज › Pune › पिंपरीत ३० ते ४० जणांच्या टोळक्‍याकडून वाहनांची तोडफोड 

पिंपरीत ३० ते ४० जणांच्या टोळक्‍याकडून वाहनांची तोडफोड 

Published On: Apr 15 2018 10:04AM | Last Updated: Apr 15 2018 10:04AMपिंपरी : प्रतिनिधी 

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून अज्ञात 30 ते 40 जणांच्या टोळक्याने पिंपरी, खराळवाडी येथे धुडगूस घालत घरांवर दगडफेक केली. तसेच वाहनांची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडला. 

पिंपरीतील खराळवडीत रात्री दहाच्या सुमारास 30 ते 40 जणांचे टोळक्‍याने वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली, तसेच घरांवर देखील दगडफेक केली. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक भयभीत झाले आहेत. महिलांमध्ये घबराहट पसरली आहे. 

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत तोडफोड करणारे टोळके पसार झाले होते. या मागील नेमके कारण अद्याप स्पस्ट झाले नाही. पिंपरी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.  

Tags : pimpri chinchwad, kharalwadi, vehicles, houses,