Thu, Apr 25, 2019 17:31होमपेज › Pune › पुणे : वैशाली, रुपाली व आंम्रपाली प्रकरण शेट्टीला जामीन मंजुर

पुणे : वैशाली, रुपाली व आंम्रपाली प्रकरण शेट्टीला जामीन मंजुर

Published On: Dec 24 2017 2:02PM | Last Updated: Dec 24 2017 2:11PM

बुकमार्क करा

पुणे : देवेन्द्र जैन

पुणे शहरातील प्रसिद्ध असलेल्या वैशाली रुपाली व आंम्रपाली हॉटेल खोट्या कागदपत्रांच्या आधारे हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जगन्नाथ शेट्टी व शशेंद्र शेट्टीं यांना न्यायालयाने काही अटी व शर्तींवर जामीन मंजुर केला

शहरातील प्रसिद्ध असलेल्या वैशाली, रुपाली व आम्रपाली हॉटेलचे ‘चालक’ जगन्नाथ शेट्टी यांचे विरोधात, सदर हॉटेलचे मुळ मालक श्रीधर बाबु शेट्टी यांच्या पत्नी अप्पी शेट्टी यांनी  २०१४ व २०१६ मध्ये तक्रार दाखल केली होती.  सदर तक्रारीनुसार अप्पी शेट्टी यांच्या ३ मुली यांनी पाठ पुरावा सुरु ठेवला होता. अखेर १३ एप्रील २०१७, जगन्नाथ शेट्टी व शशेंद्र शेट्टींच्या विरोधात ४२०, ४०६, ४६५, ४६६, ४७१, ४७४ आणि ५०६ (१)३४ कलमाअंतर्गत डेक्कन पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन ९ महीन्यानंतर सुद्धा पोलीसांनी कोणत्याही आरोपीला अटक केलेली नव्हती.

श्रीधर बाबु शेट्टी यांचे (मद्रास हेल्थ होम वैशाली हॉटेलचे मुळ नाव, व मद्रास कॅफे रुपाली हॉटेलचे मुळ नाव ) येथे जगन्नाथ शेट्टी डीश वॉशर म्हणुन कामाला होता. श्रीधर शेट्टी यांचे अपघाती निधनानंतर  स्वत: पेक्षा वीस वर्षांनी लहान असलेल्या त्यांच्या मुली बरोबर जगन्नाथ शेट्टीने लग्न केले व खोटी कागदपत्रे बनवुन अप्पी शेट्टींची मालमत्ता हडप केली आहे. मीळकत हडप करण्याकरीता जगन्नाथ शेट्टीने स्वत:च्या वडीलांचे नाव ‘होंणाय शेट्टी’ असताना वडीलांचे नाव  ‘बाबु’ शेट्टी लावुन श्रीधर शेट्टींचा भाऊ भासवुन मीळकत हडप केली असल्या बाबत तक्रारीत म्हटले आहे.

न्यायालयाने वेळोवेळी समपुदेशन व समझोता करण्याकरीता प्रयत्न केले. वादींच्या वतीने श्रीकांत शिवदे यांनी जगन्नाथ शेट्टीने केलेल्या अनेक गैर बाबींचा पुराव्यासहीत न्यायालयासमोर उलगडा केला. जगन्नाथ शेट्टी यांनी कशाप्रकारे सरकारी कागदपत्रांमध्ये हेराफेरी केल्या तसेच त्यांच्या पॅनकार्ड व पारपत्रांवर असलेल्या नावांच्या नोंदीबाबत माहीती दिली. 

जगन्नाथ शेट्टी व शशेंद्र शेट्टींच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल असताना पोलीसांवर मोठा दबाव असल्यामुळे त्यांना अटक केली जात नसल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला होता. डेक्कन पोलीस स्थानकामध्ये या बाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व हॉटेलचे मुळ मालक श्रीधर बाबु शेट्टी यांच्या पत्नी अप्पी शेट्टी यांनी अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. अप्पी शेट्टी यांच्या निधनानंतर त्यांच्या तीनही मुलींनी याचा पाठपुरावा केला होता.

पोलीसांनी आपल्या अर्जामध्ये सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असुन, जगनाथ शेट्टी व शशेंद्र शेट्टी यांनी कागदपत्रे कुठे व कधी तैयार केली. याचा तपास करायचा असून त्याकरीता त्यांची पोलीस कस्टडी गरजेची आहे, अशी मागणी केली होती. न्यायालयाने पोलीसांचे व दोन्ही बाजुच्या वकीलांचे म्हणने एैकल्यानंतर, आरोपींचा अटकपुर्व जामीन अर्ज मंजुर काही अटी शर्तींवर मंजुर केला, आरोपींची पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.तसेच दोन्ही आरोपींनी सदर गुन्ह्याचे आरोप पत्र सादर होऊ पर्यंत प्रत्येक आठवड्याच्या सोमवार व गुरुवारी सकाळी ९ ते १२ पर्यंत डेक्कन पोलीस स्थानकामध्ये हजेरी द्यावयाची आहे, तसेच दाखल गुन्ह्यातील कागदपत्रांमध्ये काहीही बदल करायचा नाही व साक्षीदार अथवा तक्रारदार यांच्या बरोबर कुठलीही गैरवर्तवणुक करावयाची नाही असे न्यायाधीश ए के पाटील यांनी आदेश दिले आहेत.