Sat, Jun 06, 2020 19:00होमपेज › Pune › उबेरच्या कॅब चालकाकडून तरुणीचा विनयभंग

उबेरच्या कॅब चालकाकडून तरुणीचा विनयभंग

Published On: Apr 07 2018 11:28AM | Last Updated: Apr 07 2018 11:28AMपुणे : प्रतिनिधी

उबेर कॅब चालकाकडून तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. कॅब चालकाने उशिरा आल्याच्या कारणावरून तरूणीला पकडून बाहेर काढत अश्लील कृत्य केले. हा प्रकार भर रस्त्यात घडल्याने खळबळ उडाली.  

पुण्यातील मध्यवस्तीत बाजीराव पुतळा परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी उबेर कॅबच्या कार चालकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून उबेर कॅबच्या चालकाचा शोध घेतला जात आहे.