Tue, Jul 23, 2019 02:24होमपेज › Pune › पिंपरी : अडीच वर्षांच्या मुलीवर बापाकडून लैंगिक अत्याचार

पिंपरी : अडीच वर्षांच्या मुलीवर बापाकडून लैंगिक अत्याचार

Published On: Dec 07 2017 11:40AM | Last Updated: Dec 07 2017 11:40AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपळे गुरव परिसरात वडिलांच्या आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. या नराधम पित्याने आपल्याच अडीच वर्षांच्या मुलीवर लेंगिकअत्याचार केल्याचे समोर आले. हा प्रकार सात ते आठ दिवसांपूर्वी घडला असून, पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगवी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई आंघोळीला गेल्‍यानंतर वडिलांनी दारूच्या नशेत तिच्यावर लैंगिक अत्‍याच्यार केले. आई अंघोळीवरून आली असता तिने स्वतः डोळ्याने हा प्रकार बघितला. यावेळी आईने  रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला मारहाण केली. 

या घटनेचा पुढील तपास सांगवी पोलिस  करत आहेत.